⚡सावंतवाडी ता.२३-: मळगाव येथील जागृत देवस्थान श्री देव देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव मंगळवार २५ नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त सकाळी धार्मिक विधी, अभिषेक, दुपारी महाप्रसाद, सायंकाळपासून देवाला केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, तसेच ईठला देवीची ओटी भरणे, देवीला कोंबडा अर्पण करणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री ढोलांच्या गजरात तरंगासहीत पालखी मिरवणूक काढण्यात येणार आहे. त्यानंतर रात्री मळगाव येथील दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे. भाविकांनी जत्रोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटीतर्फे करण्यात आले आहे.
