रुपेश राऊळ यांची संजू परब, बबन साळगावकर यांच्यावर नाव न घेता टीका: तीन तारखेला जनता यांना जागा दाखवणार
⚡सावंतवाडी ता.२३-: “नगराध्यक्ष होऊन विकास साधता आला नाही, तर नगरसेवक होऊन काय करणार?” अशा शब्दांत ठाकरे शिवसेनेचे विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी नाव न घेता संजू परब व बबन साळगावकर यांच्यावर जोरदार टीका केली.
रूपेश राऊळ म्हणाले की, “आज जनतेने त्यांना नगराध्यक्ष केलं, मात्र शहरासाठी कोणताही ठोस विकासकाम दिसली नाही दिसला नाही. त्यामुळे आता पुन्हा नगरसेवक म्हणून निवडणूक लढवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे. जनता यालाही योग्य उत्तर देईल,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
प्रभाग क्रमांक ७ मध्ये संदीप राणे व आर्य सुभेदार यांच्या प्रचार शुभारंभ कार्यक्रमात ते बोलत होते. कार्यक्रमाला पक्षातील पदाधिकारी व कार्यकर्त्यांची मोठी उपस्थिती होती. यावेळी तीन तारखेला आमचे नगराध्यक्षसह सर्व उमेदवार मोठ्या मताने विजय होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
