नेत्यांचे स्वागत करणाऱ्यांचा प्रवेश घेऊन जनतेची दिशाभूल करण्याचा त्या युवा नेत्याचा प्रयत्न…

संजू परब: बाहेरचे लोक येऊन शहरात वातावरण दहशत माजवण्याचा प्रयत्न, पोलिसांनी लक्ष घालावा, अनुचित प्रकार घडला तर पोलीस प्रशासन जबाबदार..

⚡सावंतवाडी ता.२३-: भाजपचा युवा नेता आपल्या नेत्यांचे स्वागत करणाऱ्यांचेच पक्षप्रवेश घेत लोकांना दिशाभूल करण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र जनता हे सर्व ओळखून असून तीन डिसेंबरला याचे योग्य उत्तर देईल, अशी टीका शिंदे शिवसेना संजू परब यांनी आज येथे पत्रकारांशी बोलताना केली.

परब म्हणाले की, सावंतवाडी शहरात बाहेरची लोक येऊन वातावरण तापवण्याचा, दहशत माजवण्याचा प्रयत्न करत आहेत. जर काही अनुचित घडलं तर याला संपूर्णपणे पोलिस प्रशासन जबाबदार राहील. शहरातील विविध हॉटेलमध्ये बाहेरून आलेल्या लोकांचा मुक्काम वाढत असून पोलिसांनी त्यांची तातडीने पडताळणी व तपासणी करावी, अशी मागणी त्यांनी केली.

दरम्यान सावंतवाडी पोलिसांकडून येत्या दोन दिवसात कुठली हालचाली दिसली नाही तर सिंधुदुर्ग पोलीस एसपींची आपण भेट घेणार असल्याचे देखील परब यांनी सांगितले.दरम्यान भाजपच्या प्रचारासाठी काही बाहेरचे सावंतवाडीत दाखल झाले असून त्यांच्यासोबत फिरणारे अनेक जण कोण आहेत, ते कुठून आले आहेत, याचा तपास करावा, असेही त्यांनी पोलिसांना आवाहन केले.

परब यांनी असा आरोपही केला की, बाहेरून आलेले काही लोक पैसे वाटण्याचे काम करत आहेत. याची तात्काळ दखल घेऊन कारवाई करणं आवश्यक आहे.भाजपला पराभव ओढावणार असल्याचे स्पष्ट झाल्याने त्यांचे वरिष्ठ नेते सावंतवाडीत तळ ठोकून बसले आहेत. यावरूनच भाजपची सध्याची परिस्थिती काय आहे, हे जनतेसमोर स्पष्ट झाले आहे, अशी टीका करत त्यांनी भाजपवर जोरदार निशाणा साधला.

You cannot copy content of this page