मळगाव येथील माया मायापूर्वचारी देवस्थानचा उद्या वार्षिक जत्रोत्सव…

सावंतवाडी : मळगाव येथील श्री देव माया मायापूर्वचारी देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या सोमवार २४ नोव्हेंवार रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे.
यानिमित्त मंदिरात सकाळी अभिषेक पूजा, त्यानंतर देव मायापूर्वचारी व देवी माऊलीच्या मूर्तीना वस्त्रालंकारांनी सजविण्यात येणार आहे. दुपारी महाप्रसाद होणार आहे. त्यानंतर दर्शन सुरु होणार असून नवस बोलणे-फेडणे तसेच केळी व नारळ ठेवणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्री १० वाजता पुरुष व महिला भाविकांची लोटांगणे व पालखी प्रदक्षिणा संपन्न होणार आहे. त्यानंतर रात्री उशिरा स्थानिक संयुक्त दशावतार कलाकारांचा दशावतार पौराणिक नाट्यप्रयोग सादर होणार आहे. पुनः प्रतिष्ठापनेनंतर हा पहिलाच जत्रोत्सव असल्याने या जत्रोसवाला भाविकांची मोठ्या संख्येने गर्दी उसळणार आहे.या जत्रोत्सवाला भाविक भक्तांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन देवस्थान कमिटी व ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page