⚡बांदा ता.०४-: इन्सुली खामदेव नाका येथे गाडीच्या खिडकीमधून बाहेर पडल्यामुळे चार वर्षाचा चिमुकला जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. मध्यरात्रीच्या सुमारास रस्त्याच्या बाजूला असलेल्या दरीत गाडी कोसळल्यामुळे ही घटना घडली. यात इतर कुटुंबांला देखील दुखापत झाली आहे
बांदा पोलीस घटनास्थळी दाखल झालेत. चिमुकल्याचा मृतदेह प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आला आहे. सावंतवाडी चराठा कॉलनी येथील हे कुटुंब असून या अपघातात चिमुकल्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. ही गाडी शासकीय अधिकाऱ्याची असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे.
