⚡सावंतवाडी ता.२३-: येथील राणी पार्वती देवी आरपीडी हायस्कूलची अस्मी प्रवीण मांजरेकर हिने मळगाव येथील कै. उदय रमाकांत खानोलकर वाचनालयातर्फे आयोजित केलेल्या मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत आठवी ते दहावी गटात तृतीय क्रमांक पटकाविला.
स्पर्धेत सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एकूण २० स्पर्धक सहभागी झाले होते. मोबाईल – शाप की वरदान या विषयावर तिने वक्तृत्व केले होते. दरवर्षी अस्मी या स्पर्धेत सहभाग घेत असते. यंदाही तीने या स्पर्धेत भाग घेत आपली यशस्वी कामगिरी कायम ठेवली आहे. या यशस्वीतेसाठी व आरपीडी प्रशालेचे नावलौकिक मिळवून दिल्याबद्दल अस्मी हिचे व मार्गदर्शक शिक्षकांचे शिक्षण प्रसारक मंडळ सावंतवाडी अध्यक्ष विक्रांत सावंत, उपाध्यक्ष डॉ. दिनेश नागवेकर, सचिव व्ही. बी. नाईक, खजिनदार सी. एल. नाईक, शाळा समिती अध्यक्ष अमोल सावंत, मुख्याध्यापक संप्रवी कशाळीकर, उपमुख्याध्यापक एस. एन पाटील, उपप्राचार्य डॉ. सुमेधा नाईक, सर्व संस्था सदस्य तसेच पालक,, शिक्षक – शिक्षकेतर कर्मचारी, पालक- शिक्षकसंघ यांनी अभिनंदन करून तिला शुभेच्छा दिल्या.
आरपीडीची अस्मी मांजरेकर मालती खानोलकर स्मृती जिल्हास्तरीय वकृत्व स्पर्धेत तृतीय…
