⚡मालवण ता.०४-:
गेले तीन-चार दिवस बेकायदेशीर वाळू वाहतूकी विरोधात मालवण महसूल विभागाने धडक कारवाई सुरु केली असताना काल पुन्हा एकदा महसूल विभागाने बेकायदेशीर वाळू वाहतूक करणाऱ्यांना दणका दिला आनंदव्हाळ येथे बेकायदेशीर वाळू वहातूक करणाऱ्या गोवा पासिंगच्या दोन डंपरवर महसूल विभागाने कारवाई केली
मालवण तालुक्यातील आनंदव्हाळ येथे ३ मार्च रोजी रात्री ९.५० वाजण्याच्या सुमारास अनधिकृत वाळू वाहतुक करणाऱ्या गोवा पासिंगच्या (GA-06-T 4455 व GA-08-V 6586) दोन डंपरवर मालवण तहसीलदार गणेश लव्हे यांच्या मार्गदर्शनाखाली महसूल व पोलीस विभागाच्या संयुक्त पथकाने सदरची कारवाई केली.
यावेळी मंडळ अधिकारी पीटर लोबो मंडळ अधिकारी मिनल चव्हाण, मंडळ अधिकारी गौरव दळवी, ग्राम महसूल अधिकारी बाळासो शिंदे, ग्राम महसूल अधिकारी विलास बागवे, वाहन चालक व पोलीस विभागाचे कर्मचारी आदी उपस्थित होते.
