प्रभाग ३ मध्ये भाजप उमेदवारांचा झंझावाती प्रचार…

आनंद नेवगी व मोहिनी मडगावकर यांना कार्यकर्त्यांसह जनतेचा मोठा पाठिंबा; विकासाच्या व्हिजनला उत्स्फूर्त दाद..

⚡सावंतवाडी ता.२२-: शहरातील प्रभाग क्रमांक तिन मधील भाजपचे उमेदवार आनंद नेवगी व मोहिनी मडगावकर यांनी झंजावाती प्रचार सुरू केला आहे. जवळपास 70% ते घरा घरात भाजपचा कमळ पोचवण्यात ते यशस्वी झाले आहेत दोघांनाही कार्यकर्त्यांची साथ, जनतेचा प्रचंड पाठिंबा आणि आशीर्वाद मिळत आहे. या प्रभागातून नगराध्यक्ष च्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोसले यांना मताधिक्य देण्याबरोबरच माझ्यासह सहकारी उमेदवाराला प्रचंड मताने विजयी करुन आणणार असा आशावाद सौ. मडगावकर यांनी व्यक्त केला.

प्रभाग क्रमांक तीन मध्ये आनंद नेवगी व मोहिनी मडगावकर यांनी भाजपच्या माध्यमातून निवडणुकीमध्ये उडी घेतली आहे. त्यांच्या उमेदवारीनंतर कार्यकर्त्यांनी त्यांच्या प्रचारावर जोरदार भर दिला आहे खुद्द श्री. नेवगी व सौ. मडगावकर यांनी कार्यकर्त्यांसमवेत विकासाचे व्हिजन पोहोचविले आहे
एकूणच दोघांच्याही कामावर आणि विकासाच्या व्हिजनावर लोकांचा त्यांना प्रचंड पाठिंबा मिळत आहे. जनतेने माझ्यावर विश्वास ठेवावा समस्या याच माझ्या समस्या समजून भविष्यात त्या दृष्टीने मी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, खासदार नारायण राणे, पालकमंत्री नितेश राणे, यांच्या माध्यमातून काम करणार आहे.
तसेच या ठिकाणी नगराध्यक्षपदाच्या उमेदवारासह दोन्ही उमेदवाराला जनतेने कमळ या चिन्हा समोरील बटन दाबून विजयी करावे असे आवाहन नेवगी व सौ.मडगावकर यांनी केले.

You cannot copy content of this page