⚡मालवण ता.२२-:
सध्या कतार येथे चालु असलेल्या इमर्जिंग आशिया कप स्पर्धेत भारत अ संघाच्या सपोर्ट स्टाफ मधे मालवण तालुक्यातील मसुरे- बांदिवडे चा सुपुत्र शाहुलखन सतिश बांदिवडेकर याची निवड करण्यात आली आहे
शाहू लखन बांदिवडेकर हा एक उत्कृष्ट क्रिकेटपटू असून भारतीय अ क्रिकेट संघाचा एक सहकारी म्हणून काम करण्याचा अनुभव अतिशय सुखद आहे यापूर्वीही शाहू लखन बांदिवडेकर याची भारतीय क्रिकेट ज्युनिअर मुलींच्या संघाचा सहाय्यक प्रशिक्षक म्हणून सुद्धा निवड झाली होती.
यावेळी मुख्य प्रशिक्षक सुनील जोशी, सहाय्यक प्रशिक्षक सैराज बी, फिल्डिंग कोच आर श्रीधर, व्हिडिओ विश्लेषक देवराज राऊत, प्रबंधक स. शौर्य हे सुद्धा यावेळी या संघासोबत काम करत आहेत. शाहू लखन बांदिवडेकर यांच्या या निवडीबद्दल त्याचे सर्वत्र अभिनंदन होत आहे
