⚡सावंतवाडी, ता.२२-: प्रभाग क्रमांक २ मधील भाजप उमेदवार बबन साळगावकर व सुनीता पेडणेकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ आज भाजप युवा नेते विशाल परब यांच्या उपस्थितीत उत्साहात पार पडला. प्रचाराच्या प्रारंभी नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती पाहायला मिळाली.
यावेळी बोलताना विशाल परब म्हणाले की, “देशात व राज्यात भाजपची सत्ता असल्याने विकासकामांना वेग आला आहे. या नेतृत्वाच्या बळावर आमचे दोन्ही उमेदवार तसेच नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारांना तुमचा प्रेमाचा आशीर्वाद लाभावा. त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे राहून त्यांना भरघोस मतांनी निवडून द्या,” असे आवाहन त्यांनी उपस्थित नागरिकांना केले.
प्रचाराच्या शुभारंभामुळे प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
