कळसुलीमध्ये नवीन ११ के.व्ही. वीज लाईन पूर्ण…

ग्रामस्थांनी मानले पालकमंत्री नाम. नितेश राणेंचे आभार..

कणकवली : तालुक्यातील कळसुली गावातील गेल्या अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या वीज समस्येवर अखेर तोडगा निघाला असून ग्रामस्थांना दिलासा मिळाला आहे. पालकमंत्री नितेश राणे यांच्या पुढाकाराने कणकवली फिडरवरून कळसुलीसाठी नवीन ११ के.व्ही. वीज लाईन टाकण्याचे व नवीन पोल बसविण्याचे काम पूर्ण झाले आहे.

गेल्या काही काळापासून कमी व्होल्टेज तसेच वारंवार खंडित होणाऱ्या वीजपुरवठ्यामुळे ग्रामस्थांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. सरपंच सचिन पारधिये यांनी ही बाब पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणताच त्यांनी तत्काळ कोटींचा निधी मंजूर करून काम वेगाने पूर्ण करण्यास मदत केली.

दरम्यान, कळसुली मुख्य रस्ता – परबवाडी बाधा येथे नवीन ब्रीज बांधकामालाही मंजुरी मिळाली असून आज या कामाचा भूमिपूजन सोहळा पूर्ण करण्यात आला. या दोन्ही कामांच्या उद्घाटनासाठी भारतीय जनता पक्षातर्फे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

कार्यक्रमास भाजप तालुका अध्यक्ष मिलिंद मेस्त्री, उपतालुकाध्यक्ष शशिकांत राणे, तालुका कार्यकारिणी सदस्य लक्ष्मण गावडे, सरपंच सचिन पारधिये, उपसरपंच दत्ताराम परब, गाव अध्यक्ष जयवंत घाडीगांवकर, माजी सरपंच अतुल दळवी, माजी उपसरपंच गजानन मठकर, प्रवीण दळवी, दिलीप सावंत, बूथ अध्यक्ष आत्माराम उर्फ राजू नार्वेकर, ग्रामपंचायत सदस्य राजेंद्र दळवी, सुभदा देसाई, दीपक मेस्त्री तसेच अन्य मान्यवर उपस्थित होते. ग्रामस्थांचीही मोठ्या संख्येने उपस्थित होते. ग्रामस्थांनी पालकमंत्री नितेश राणे यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त केले.

You cannot copy content of this page