⚡वेंगुर्ला ता.२०-: वेंगुर्ला नगरपरिषद सार्वत्रिक निवडणुक 2 डिसेंबर रोजी संपन्न होत आहेउद्धव ठाकरे शिवसेनेच्या वतीने वेंगुर्ला ग्रामदैवत श्री देव रामेश्वर देवतेस श्रीफळ अर्पण करून तसेच शिवसेना शाखेच्या येथून प्रचारास प्रारंभ करण्यात आला. ठाकरे शिवसेनेचे थेट नगराध्यक्ष पदाचे उमेदवार संदेश निकम व अन्य नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्या प्रचारार्थ आज शिवसेना शाखा पासून दाभोसवाडा, वेंगुर्ला बंदर रोड आदी कार्यक्षेत्रात सुमारे 200 कार्यकर्त्यांसह प्रचार करण्यात आला. यावेळी उमेदवार संदेश निकम, तालुकाप्रमुख यशवंत उर्फ बाळू परब,माजी जिल्हा परिषद सदस्या सुकन्या नरसुले, रॅक्स परेरा, सौ. लोणे, साक्षी चमणकर आदीसह अन्य उमेदवार, कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. संदेश निकम व ठाकरे शिवसेनेने प्रचारात घेतलेली आघाडीबाबत नाक्यानाक्यावर ठाकरे शिवसेनेचे समर्थकातून चर्चा होत होती. वेंगुर्ला शहराला ठाकरे शिवसेनेच्या माध्यमातून विकासात्मक, जनतेस अभिप्रेत असे स्वच्छता कार्य केले जाईल, असे यावेळी संदेश निकम यांनी बोलताना सांगितले.
वेंगुर्ला नगरपरिषद निवडणुकीसाठीउद्धव ठाकरे शिवसेनेच्या प्रचारास प्रारंभ…
