पालकमंत्री उदय सामंत यांची पत्रकार परिषदेत माहिती; लहान मुलांसाठी ५० बेड चे रुग्णालय सुरू करणार*
*💫सावंतवाडी दि.११-:* सिंधुदुर्ग जिल्ह्यासाठी कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी लागणारे प्लाझ्मा मशीन घेण्यासाठी आज झालेल्या बैठकीत २५ लाख रुपये निधी मंजूर करण्यात आला असून, लवकरच ही मशीन घेण्यात येणार असल्याची माहिती पालकमंत्री उदय सामंत यांनी झूम ऍप द्वारे आयोजित करण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत दिली आहे. तसेच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत लहान मुलांवर परिणाम होऊ शकतो. असे अनेक तज्ञांचे मत असल्याने त्याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात लहान मुलांसाठी ५० बेड चे विशेष रुग्णालय सुरू करण्यात येणार असून, त्याची कार्यवाही उद्या पासून सुरु करण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली आहे. तसेच जिल्ह्यात जास्तीत जास्त लस मिळवून देण्यासाठी आपण प्रयत्नशील असल्याचे पण त्यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.
