भाजपचे माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे व प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत यांनी केले उमेदवारी अर्ज दाखल…

कणकवली : कणकवली नगरपंचायतीच्या निवडणुकीसाठी नगरसेवकपदासाठी भाजपचे माजी उपनगराध्यक्ष गणेश उर्फ बंडू हर्णे व प्रतीक्षा सावंत, मेघा सावंत यांनी रविवारी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

नगरपंचायत निवडणुकीसाठी १० नोव्हेंबरपासून अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया सुरू झाली. पहिले पाच दिवस एकही अर्ज दाखल झाला नव्हता. शनिवारी भाजपकडून नगराध्यक्षपदासाठी समीर नलावडे तर नगरसेवकपदासाठी १० जणांनी उमेदवारी अर्ज निवडणूक निर्णय अधिकारी दीक्षांत देशपांडे यांच्याकडे सादर केले होते.

विकेंडच्या दिवशी माजी उपनगराध्यक्ष बंडू हर्णे यांनी प्रभात १३ मधून तर प्रतीक्षा सावंत यांनी प्रभाग २, प्रभात ९ मेघा सावंत मधून उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष अण्णा कोदे, राजन परब, माजी नगरसेवक अभिजीत मुसळे, जावेद शेख, सुशील दळवी, नवू झेमणे, सिद्धेश वालवलकर, कुंदन हर्णे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी आपला विजय होऊन प्रभाग २,९, १३ मध्ये कमळ फुलेल, असा विश्वास व्यक्त केला.

You cannot copy content of this page