⚡कणकवली ता.१६-: जाणवली घरटनवाडी येथे राहणाऱ्या परतांचे विवाहित महिला पुनम कुमारी संतोष कुमार महतो (वय २४, मूळ रा. बिहार) हिने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवारी पहाटे उघडकीस आली. या प्रकरणी पती संतोष कुमार साबा महतो यांच्या फिर्यादीवरून कणकवली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, काही किरकोळ कारणावरून पुनम कुमारी हिने आपल्या लहान मुलाला मारहाण केली होती. याचा पती संतोष कुमार यांना राग आल्याने त्यांनी पत्नीला मारहाण केल्याचे समजते. या रागातून आणि मानसिक तणावातून पुनम कुमारीने आत्महत्या केली असावी, असा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेचा पुढील तपास कणकवली पोलिसांकडून सुरू आहे.
कणकवलीत विवाहितेची आत्महत्या…
