नट वाचनालयात बिरसा मुंडा जन्मदिवस उत्साहात साजरा…

⚡बांदा ता.१६-: येथील नट वाचनालयात भगवान बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस जनजाती गौरवदिन म्हणून साजरा करण्यात आला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत दीपप्रज्वलन झाल्यावर बिरसा मुंडा यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालण्यात आला.
यावेळी वाचनालयाचे अध्यक्ष एस आर सावंत, उपाध्यक्ष नीलेश मोरजकर, सचिव राकेश केसरकर, संचालक प्रकाश पाणदरे, जगन्नाथ सातोस्कर, शंकर नार्वेकर, ज्येष्ठ नागरिक संघाचे सचिव गुरुनाथ नार्वेकर, अनंत भाटे, केंद्रशाळेचे मुख्याध्यापक शांताराम असनकर, श्री राणे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राकेश केसरकर यांनी केले.

You cannot copy content of this page