⚡सावंतवाडी ता.१६-: येथील नगर परिषदेच्या 2 डिसेंबरला होऊ घातलेल्या निवडणुकीसाठी शिंदे शिवसेनेसह भारतीय जनता पार्टीच्या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारासह नगरसेवकांनी जोरदार शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले.
भाजपाकडून युवराज्ञी श्रद्धा सावंत भोसले या नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार असल्याचे युवा नेते विशाल परब यांनी यावेळी जाहीर केले. तर दुसरीकडे भाजपाकडूनच इच्छुक असलेल्या अन्नपूर्णा कोरगावकर यांनी सुद्धा नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटचा दिवस असून,भाजपा, ठाकरे सेना हे उर्वरित जागांसाठी तर काँग्रेस पक्षाकडून नगराध्य पदासह नगरसेवकांच्या जागावर उमेदवारी अर्ज दाखल करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीला आता हळूहळू रंग येऊ लागली आहे उमेदवारी अर्ज भरण्यासाठी उद्या शेवटचा दिवस असताना आज रविवारी भाजप आणि शिंदे शिवसेनेच्या वतीने जोरदार शक्ती प्रशिक्षण करण्यात आले आमदार दीपक केसरकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल करणे आधी श्री देव पाटेकर श्री देव उपरलकर यांचे आशीर्वाद घेऊन शहरातून रॅली द्वारे नगरपालिकेमध्ये उमेदवारांसह दाखल होत उमेदवारी अर्ज भरले. तर दुसरीकडे भारतीय जनता पार्टी कडून युवा नेते विशाल परब यांच्या नेतृत्वाखाली शक्ती प्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले दोन्ही पक्षांचा विचार करता एक प्रकारे कार्यकर्त्यांच्या चेहऱ्यावर आणि उमेदवारांच्या चेहऱ्यावर उत्साह आणि आनंद दिसून येत होता, सावंतवाडी नगरपालिकेच्या परिसरात उमेदवारासह त्या त्या पक्षाचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित असल्याने मोठी गर्दी पाहायला मिळत होती.
शिंदे शिवसेनेकडून नगराध्यक्ष पदासाठी ॲड निता सावंत कविटकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला तर डमी म्हणून भारती मोरे यांनी उमेदवारी अर्ज भरण्यात आला नगरसेवक पदासाठी दिपाली सावंत, सुरेंद्र बांदेकर, दुर्गेश सुर्याजी, संजना पेडणेकर, आरती सावंत, वैभव खम्हापसेकर, गोविंद वाडकर, नासिर पटेल, सायली दुभाषी, प्रसाद नाईक, उत्कर्षा सासोलकर, राहूल नाईक, गुरुप्रसाद मिशाळ, परिक्षीत मांजरेकर यांच्यासह माजी नगराध्यक्ष संजू परब, बाबु कुडतरकर, अजय गोंदावळे आदी सर्वच उमेदवारांनी उमेदवारी दाखल केली.
दुसरीकडे भाजपकडून नगराध्यक्ष पदासाठी युवराज्ञी श्रद्धा सावंत भोसले यांनी उमेदवारी दाखल केली,तर नगरसेवक पदासाठी दिपाली भालेकर, सुधिर आडिवरेकर, राजू बेग, आनंद नेवगी, सुनिता पेडणेकर, उदय नाईक, मेघना राऊळ, मोहिनी मडगावकर, दुराली रांगणेकर, समृद्धी विर्नोडकर, प्रतिक बांदेकर, प्रेमानंद बबन साळगावकर, सुकन्या टोपले, अनिल निरवडेकर, वेदिका सावंत यांनी उमेदवारी दाखल केली. दुसरीकडे भाजपाकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या अन्नपूर्णा कोरेगावकर यांनी स्वतंत्र कुटुंबासमवेत येत नगराध्यक्ष पदाची उमेदवारी दाखल केली. त्यांनी अपक्ष आणि भाजपा असे दोन उमेदवारी अर्ज. त्याच्यासोबत यावेळी वडील श्रीरंग आचार्य, माजी नगरसेवक ॲड पुष्पलता कोरगावर, व्यंकटेश शेट, ऐश्वर्या कोरगावकर, अखिलेश कोरगावकर आदी उपस्थित होते. दरम्यान उबाटाकडून शहर संघटक निशांत तोरसकर व शिप्रा सावंत यांनी उमेदवारी दाखल केली. उद्या उमेदवारी अर्ज भरण्याचा शेवटच्या दिवशी काँग्रेसकडून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असलेल्या साक्षी वंजारी यांच्यासह नगरसेवक पदासाठी इच्छुक असलेले काही जणांकडून उमेदवारी दाखल करण्यात येणार आहे. तर भाजपाचे काहीजण उद्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. एकूणच उमेदवारी अर्ज भरताना आज झालेल्या गर्दीमुळे सावंतवाडी नगरपरिषदेच्या निवडणुकीमध्ये एकप्रकारे रंगत वाढू लागली आहे.
