बांदा/प्रतिनिधी
श्री देव रवळनाथ, भवानी, ब्राह्मण प्रमुख पंचायत देवनस्थान, बांदा (महाजन, काणेकर, मुंगी या घराण्यांचे देवस्थान) येथे वार्षिक उत्सव २५, २६ व २७ नोव्हेंबर रोजी अत्यंत भक्तिमय वातावरणात साजरा करण्यात येणार आहे. देवनस्थानाच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या कार्यक्रमानुसार विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले असून सर्व भक्त, भाविक, सहकुटुंब सहपरिवार उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मंगळवार, दि. २५ रोजी दुपारी १२.३० वाजता आरती व महाप्रसाद, रात्री ७ वाजता भवानीचा गोंधळ, दिवटीचा कार्यक्रम व अवसारी कौल, रात्री १०.३० वाजता श्री भवानीचा महाप्रसाद, पहाटे ६ वाजता दिवटी विसर्जन. बुधवार, दि. २६ रोजी दुपारी १२.३० वाजता आरती व महाप्रसाद, रात्री ८ वाजता पंचायतनाचा अवसारी कौल. गुरुवार, दि. २७ रोजी सकाळी ९ वाजता श्रींचे नामस्मरण, सकाळी १०.३० पासून संपूर्ण वर्षात श्री देवीस अर्पण केलेल्या ओटींच्या साड्या खणांची व श्री भवानीच्या मांडावरील कलशातील श्रीफळ व नाण्यांची पावणी, दुपारी १.३० वाजता श्री पंचायतनांस महाप्रसाद, आरती व पंचायतनाचा अवसारी कौल, सायंकाळी ६.३० वाजता प्रसाद पाकळी कौल आदी धार्मिक कार्यक्रम होणार आहेत.
उत्सवाच्या पार्श्वभूमीवर भाविकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून धार्मिक कार्यक्रमांचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
श्री देव रवळनाथ-भवानी ब्राह्मण प्रमुख पंचायत देवनस्थानचा वार्षिक उत्सव २५ ते २७ नोव्हेंबरला…
