सावंतवाडीत उबाठा शिवसेने कडून नगराध्यक्षासह १६ अर्ज दाखल…

⚡सावंतवा डी ता.१६-: शिवसेना उबाठा कडून १६ अर्ज नगराध्यक्षासह दाखल केलेत. उर्वरित अर्ज उद्या दाखल करू कॉग्रेससह चर्चा सुरू असल्याने चार अर्ज शिल्लक आहेत. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष सोबत असून कॉग्रेसही सोबत येईल असा विश्वास उबाठा शिवसेना विधानसभा प्रमुख रूपेश राऊळ यांनी व्यक्त केला.

ते म्हणाले, सामान्यांचे प्रश्न सोडविण्यासाठी आमचा हेतू आहे. निवडणूक आम्ही देखील गांभिर्याने घेतली आहे. आमच प्राधान्य सामान्य जनता आहे. आमच्या उमेदवार सीमा मठकर या जनसामान्यांसाठी कार्यरत आहेत. सावंतवाडीचा विकास हाच आमचा ध्यास आहे असा दावा केला. यावेळी नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सौ. सीमा मठकर, समीरा खलिल, उमेश कोरगावकर, निशांत तोरसकर, शैलेश गवंडळकर, कृतिका कोरगावकर, संदिप वेंगुर्लेकर, शेखर सुभेदार आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page