पाटेकर आणि उपरलकर देवाचा आशीर्वाद घेऊन मी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला …

युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले:आम्हाला सावंतवाडी विकसित करायची आहे..

⚡सावंतवाडी ता.१६-: पाटेकर आणि उपरलकर देवाचा आशीर्वाद घेऊन मी नगराध्यक्षपदासाठी अर्ज दाखल केला आहे. देवेंद्र फडणवीस, नारायण राणे, रवींद्र चव्हाण, नितेश‌ राणेंच्या मार्गदर्शनाखाली आम्ही सर्वांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. आम्हाला सावंतवाडी विकसित करायची आहे. सावंतवाडीला ‘सुंदरवाडी’ करायची आहे. जनतेनं संधी दिली तर ते करून दाखवू असा विश्वास भाजपच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला.

त्या म्हणाल्या, महिलांसाठी सुरक्षा, कचरा व्यवस्थापन आणि रोजगार निर्मितीवर माझा विशेष लक्ष आहे. महिलांना संधी देण्याचा माझा उद्देश आहे. सावंतवाडीला आम्ही ग्लोबल मॅपवर आणू, आपलं शहर मागे राहणार नाही असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, युवा नेते विशाल परब, सौ. वेदिका परब, शहराध्यक्ष सुधीर आडिवरेकर आदी उपस्थित होते.

You cannot copy content of this page