⚡मालवण ता.१४-:
मालवण नगरपालिका निवडणुकीसाठी आज सलग दुसऱ्या दिवशीही उबाठा शिवसेनेने माजी आमदार वैभव नाईक यांच्या उपस्थितीत जोरदार शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केले. उबाठा शिवसेनेने उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आघाडी घेतली आहे. उबाठा शिवसेनेने अनेक तरुण व नव्या उमेदवारांना संधी देण्यात आल्याचे दिसून आले.
उबाठा शिवसेनेकडून मंदार ओरसकर, तपस्वी मयेकर, महेश जावकर, सौ. स्मिता सरमळकर, सौ. पूजा जोगी, सौ. माधुरी प्रभू, निलेश दुदवडकर यांनी उमेदवारी अर्ज दाखल केले. तर महाविकास आघाडीतील काँग्रेस पक्षाकडून संदेश कोयंडे यांनी अर्ज दाखल केला. यावेळी मोठ्या संख्येने शिवसेना व काँग्रेसचे पदाधिकारी उपस्थित होते.
