गोव्याच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या कार्यातून दिला मानवतेचा संदेश

*ऑक्सिजन सिलिंडर पुरवठा केल्याने मनसे सचिव आकाश परब यांनी मानले गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांचे आभार

*💫वेंगुर्ले दि.१०-:* गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी शेजारधर्म पाळत सिंधुदुर्गच्या मदतीला येत ऑक्सिजन सिलिंडरचा पुरवठा केल्याने सावंतवाडी मनसे सचिव आकाश परब यांनी गोव्याचे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांचे आभार व्यक्त केले आहे. परंतु त्यांनी केलेल्या मदतीवर गोवा कॉंग्रेसकडून करण्यात आलेले राजकारण चुकीचे आहे असे मत त्यांनी व्यक्त केले आहे. परंतु या राजकारणावर लक्ष न देता सेवाभावी वृत्तीने गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी मदत करत कोणीही राजकारण न करता या कठीण काळात एकत्र येऊन लढा देण्याचा संदेश दिला आहे.

You cannot copy content of this page