*चौके सरपंच राजा गावडे यांच्या दणक्यानंतर लसीकरण केंद्रावर स्थानिकांना प्राधान्य

सरपंच गावडे यांनी व्यक्त केले समाधान

मालवण (प्रतिनिधी) कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहिमेसाठी शासनाने सुरू केलेल्या ऑनलाईन नोंदणी पद्धतीचा दुसऱ्याच तालुक्यातील काहीजणांकडून फायदा उठविला जात असल्याने स्थानिकांना लसीकरणापासून वंचित राहावे लागत असल्याची भांडाफोड चौके सरपंच राजन तथा राजा गावडे यांनी केल्यानंतर मध्यरात्री केले जाणारे लसीकरणाचे सेशन कार्यान्वित न केल्याने आज चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात बहुतांश स्थानिकानाच लसीकरणाचा लाभ घेता आल्याचे सुखद चित्र दिसून आले चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात ४५ वर्षावरील नागरिकांच्या दुसऱ्या लस साठी उपलब्ध झालेले ५० डोस ऑफलाईन व ऑन दि स्पॉट नोंदणी पद्धतीने देण्यात आल्याने सरपंच राजा गावडे यांनी समाधान व्यक्त केले आहे दरम्यान, यापुढेही आरोग्य विभागाने ऑन दि स्पॉट लसीकरण नोंदणी पद्धत राबवावी अशी मागणी गावडे यांनी केली आहे यासंबंधीचे अधिक वृत्त असे की, चौके गावचे सरपंच राजा गावडे यांनी लसीकरणच्या ऑनलाईन नोंदणी पद्धतीला आक्षेप घेत चौके प्राथमिक आरोग्य केंद्रात जी दोनवेळा लसीकरण मोहीम राबविली गेली, त्यात स्थानिकांना डावलून कणकवली, ओरोस, वेंगुर्ला कुडाळ येथील लोकांनी या लसीचा लाभ घेतल्याचा गंभीर आरोप केला होता. तसेच या प्रकाराची सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकाऱ्यांनी तसेच राज्याच्या आरोग्य संचालकांनी चौकशी करावी अशी मागणी केली होती. राजा गावडे यांनी केलेल्या आरोपानंतर तसेच लसीकरणच्या ऑनलाईन नोंदणीतील घोळाबाबत सोशल मीडियावर तसेच वृत्तपत्रांमधून वृते प्रसिद्ध झाल्यानंतर याची दखल आरोग्य यंत्रणेने घेतली. चौके प्राथमिक केंद्रात ४५ वर्षा वरील नागरिकांच्या लसीच्या दुसऱ्या डोससाठी ५० डोस उपलब्ध झाले होते. हे डोस ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने नोंदणी असणाऱ्या नागरिकांना देण्यात येणार होते. मात्र आरोग्य विभागाकडून ऑफलाईन पद्धतीने म्हणजे ऑन दि स्पॉट नोंदणीद्वारे ५० डोस नागरिकांना देण्यात आले. तर ऑनलाईन नोंदणीत आरोग्य विभागाकडून लसच्या उपलब्धतेबाबत देण्यात येणारे सेशन कार्यान्वित करण्यात आले नव्हते. आरोग्य विभागाने ऑफलाईन नोंदणीने लस दिल्याबद्दल तसेच त्यात स्थानिकांना प्राधान्य दिल्याने सरपंच राजन गावडे यांनी समाधान व्यक्त केले.

You cannot copy content of this page