⚡वेंगुर्ला ता.१२-: पुढील महिन्यात
होऊ घातलेल्या वेंगुर्ला नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी सर्वच पक्ष ताकतीने निवडणुकीत उतरत आहेत. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने वेंगुर्ले नगरपरिषदेच्या निवडणुकीसाठी नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर करण्यात आले.
त्यांच्यासह नगरसेवक पदासाठी ही 3 उमेदवारांची ही नावे जाहीर करण्यात आली असून अन्य उमेदवारांची नावे लवकरच जाहीर करू असे सांगण्यात आले. राष्ट्रवादी पक्षाची बैठक वेंगुर्ले येथे पार पडली. आगामी नगर परिषदेच्या निवडणुकी संदर्भात सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर करण्यात आले. तर नगरसेवक पदासाठी माजी नगराध्यक्षा नम्रता कुबल, स्वप्नील रावळ, वामन कांबळे हे उमेदवार निवडणूक लढवणार आहेत. महाविकास आघाडी बाबत अद्याप चर्चा झालेली नसून पुढे चर्चा झाल्यास त्यावेळी पुढील निर्णय घेण्यात येईल, असे माजी नगराध्यक्ष आणि शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रदेश उपाध्यक्ष नम्रता कुबल यांनी सांगितले.
शरद पवार रा. काँग्रेस तर्फे वेंगुर्ले न.प. नगराध्यक्ष पदासाठी नितीन कुबल यांचे नाव जाहीर…
