अभय मालवणकर यांची सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी निवड…

⚡सावंतवाडी ता.११-: महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या सावंतवाडी तालुका काँग्रेस अध्यक्षपदी अभय मालवणकर यांची निवड करण्यात आली आहे.

प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या कार्यालयात निवड समिती समोर ब्लॉक अध्यक्षांच्या मुलाखती घेण्यात आल्या. या मुलाखतीनंतर मालवणकर यांच्या निवडीची घोषणा करण्यात आली. या मुलाखतींमध्ये अभय मालवणकर यांनी प्रभावीपणे आपली बाजू मांडली. निवड समितीने त्यांच्या कार्याचा आणि योगदानाचा विचार करून सावंतवाडीसाठी त्यांची निवड निश्चित केली. निवडीनंतर मालवणकर यांना तातडीने आपल्या ब्लॉकची कार्यकारिणी गठीत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यांना पंधरा दिवसांच्या आत आपली संपूर्ण कार्यकारिणी तयार करून जिल्हाध्यक्षांकडे सुपूर्द करण्याचे व आपल्या भागातील काँग्रेस पक्ष बळकट करण्यासाठी आपण जोमाने प्रयत्न करावे, असे आदेश देण्यात आले. या संदर्भात, काँग्रेस वरिष्ठ उपाध्यक्ष ऍड. गणेश पाटील यांनी पत्राद्वारे माहिती कळविली

You cannot copy content of this page