⚡मालवण ता.१०-:
चोरीच्या उद्देशाने घरात घुसलेल्या
अज्ञात चोरट्यानी कट्टा खालची गुरामवाडी येथे राहणाऱ्या रोहिणी रमेश गुराम (वय 65) या वृद्ध महिलेवर खुनी हल्ला चढवीत पोबारा केल्याची घटना घडली आहे अज्ञात चोरट्यानी केलेल्या हल्ल्यात श्रीमती रोहीनी गुराम यांना जीव गमवावा लागला असून दिवसाढवल्या घडलेल्या या घटनेने सर्वत्र खळबळ माजली आहे
दरम्यान, गंभीररित्या जखमी अवस्थेतील त्या महिलेला शेजारी व नातेवाईक यांनी ग्रामीण रुग्णालय पेंडुर कट्टा येथे दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला मयत घोषणा केली. याबाबत पोलिसांना माहिती देण्यात आली. पोलीस घटनास्थळी दाखल झाले आहेत. पंचनामा व पुढील तपास सुरु आहे. मात्र, हल्लेखोर चोरट्याचा तात्काळ शोध घेऊन कठोर कारवाई झाली पाहिजे अन्यथा मृतदेह ताब्यात घेणार नाही अशी भूमिका नातेवाईकांसह ग्रामस्थांनी घेतली आहे
