वाफोलीत श्री देवी माऊलीचा जत्रोत्सव १२ नोव्हेंबरला…

बांदा/प्रतिनिधी
वाफोली गावचे ग्रामदैवत श्री देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव बुधवार दिनांक १२ नोव्हेंबरला होणार आहे. यानिमित्त माऊलीच्या दर्शनासाठी सकाळपासून रात्री उशिरापर्यंत भाविकांची अलोट गर्दी होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी धार्मिक कार्यक्रम आटोपल्यानंतर माऊलीला भरजरी वस्त्रांसह सुवर्ण अलंकार व आकर्षक फुलांनी सजविणार आहेत. दिवसभर नवस फेडणे, नवस बोलणे, देवीची ओटी भरण्याचे कार्यक्रम होणार आहेत. रात्री १२ वाजता मंदिराभोवती ढोलताशांच्या आणि फटाक्यांच्या आतषबाजीसह पालखी मिरवणूकीनंतर मामा मोचेमाडकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्यप्रयोग होणार आहे. भाविकांनी कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आवाहन श्री देवी माऊली देवस्थान समिती प्रमुख मानकरी आणि मुंबई संस्था यांच्या वतीने करण्यात आले आहे.
फोटो:-
श्री देवी माऊली मंदिर वाफोली.

You cannot copy content of this page