Headlines

परुळे येथील आदिनारायण देवस्थानचा जत्रोत्सव उद्या…

⚡सावंतवाडी ता.०९-: परुळे येथील श्री देव आदिनारायण देवस्थानचा वार्षिक जत्रोत्सव उद्या सोमवार १० नोव्हेंबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रमांनी साजरा होणार आहे. यानिमित्त मंदिरात सकाळी भगवान श्री आदिनारायणांच्या चरणी लघु सौर, दुपारी महाप्रसाद, केळी नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे, रात्री १०. ०० वाजता पुराण वाचन व त्यानंतर श्रींची सवाद्य पालखी प्रदक्षिणा होणार आहे. रात्री १२ वाजता आरोस येथील जय हनुमान दशावतार नाट्य मंडळाचा दशावतारी नाट्यप्रयोग होणार असून पहाटे दहीकाला होउन जत्रोत्सवाची सांगता होणार आहे. भाविकांनी या जत्रोसावाचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले आहे.

You cannot copy content of this page