प्रकाश कुशे:मालवण येथे राज्य हौशी मराठी नाट्यस्पर्धेला उत्साही सुरुवात..
⚡मालवण ता.०६-:
राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेत जे भाग घेतलेले कलावंत आहेत, त्यांना कोणताही गुरु नाही, कोणतेही पाठबळ नाही, ते स्वतःच्या हिंमतीवर नाट्यस्पर्धेत भाग घेऊन आपली कला सादर करतात त्यामुळे परीक्षकांनी या सर्व बाबींचा विचार करून परीक्षण करावे तसेच कलावंतांनी रंगमंचावर साकारलेल्या कलेला इथल्या नाट्यरसिकांनी उदंड प्रतिसाद देऊन ही नाट्य स्पर्धा यशस्वी करावी असे प्रतिपादन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष आणि नाट्यकर्मी प्रकाश कुशे यांनी येथे बोलताना केले.
महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य संचालनालय आयोजित ६४ वी महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धा २०२५-२६ ची प्राथमिक फेरी ६ ते १५ नोव्हेंबर या कालावधीत मालवण केंद्रात मामा वरेरकर नाट्यगृहात होत असून या स्पर्धेचे उदघाटन अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मालवण शाखेचे अध्यक्ष प्रकाश कुशे यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले. यावेळी स्पर्धेचे परीक्षक विजय कोळवणकर (मुंबई), विष्णू केरकर (ठाणे), सुजाता गोडसे (इचलकरंजी), नाट्य समीक्षक विनायक कोळंबकर, समन्वयक संजय शिंदे आदी उपस्थित होते.
प्रारंभी समन्वयक संजय शिंदे यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले या नाट्य स्पर्धेला रसिकानी मोठ्या प्रमाणावर उपस्थिती दर्शविली
