*बांदा दि.१०-:* जिल्ह परिषद केंद्रशाळा बांदा नं. १ शाळेच्या विद्यार्थ्यांनी जागतिक मातृदिनाच्या निमित्ताने माझी आई माझा अभिमान, तिच्यातील मातृत्वाचा सन्मान करण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपल्या आईला भेटकार्ड देऊन कृतज्ञता व्यक्त केली. शाळेतील शिक्षक श्री जे. डी. पाटील यांनी मातृदिनाच्या निमित्ताने आपल्या घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून आकर्षक भेटकार्ड बनवून आपल्या आईला सन्मानपूर्वक द्यावे असे शाळेच्या वाॅटसप ग्रुपवर कळविले होते. त्यानुसार विद्यार्थ्यांना घरात उपलब्ध असलेल्या साहित्याचा वापर करून आकर्षक भेटकार्ड तयार केली व त्यावर शुभेच्छा संदेश लिहून ही भेटकार्ड आपल्या आईंना देऊन कृतज्ञता व्यक्त केली. या दिवशी शाळेत यावर्षी पहिलीत दाखल होणाऱ्या सर्वज्ञ सूर्यकांत वराडकर या विद्यार्थ्यांने आई माझी मायेचा सागर या सादर केलेल्या गीताने सर्वांची वाहवा मिळवली. या विद्यार्थ्यांला मुख्याध्यापिका सरोज नाईक, उर्मिला मोर्ये, रसिका मालवणकर,शुभेच्छा सावंत, रंगनाथ परब,वंदना शितोळे, जागृती धुरी, प्राजक्ता पाटील यांचे मार्गदर्शन लाभले.
बांदा केंद्रशाळेच्या विद्यार्थ्यांनी आईविषयी व्यक्त केली कृतज्ञता…
