Headlines

सत्ताधाऱ्यांनो…टेंडरचा खेळ नंतर करा,पहिल्यांदा ऑक्सिजन पुरवठा करा-प्रमोद जठार…

*💫कणकवली दि.१०-:* पालकमंत्री उदय सामंत व सत्ताधारी आमदार फोन करुन विनंती केली आहे थोडे उदार व्हा…!! मागेल त्याला ॲाक्सीजन व व्हेंटीलेटर देण्याचे काम जो पर्यंत पुर्ण होत नाही तोपर्यंत थांबु नका. प्रशासन अजुनही टेंडर प्रक्रियेत अडकले आहे,त्याला धाकात ठेवा.पहिल्यांदा सत्ताधाऱ्यांनो…टेंडरचा खेळ नंतर करा,पहिल्यांदा ऑक्सिजन पुरवठा करा,अशी मागणी केल्याचे भाजपा प्रदेश सचिव प्रमोद जठार यांनी सांगितले. प्रत्येक तालुक्यात या गोष्टींचा पुरवठा करा, लोक आपल्या कडे मरताना ॲाक्सीजन व व्हेटीलेटर इंजेक्शन मागतात. ते पण आपण त्यांना वेळेवर देऊ शकलो नाही. तर राज्य कशासाठी, कोणासाठी करावयाचे ? परिस्थतीचे गांभीर्य ओळखा किमान तिसरी लाट येण्यापुर्वी तरी व्यवस्था पुर्ण करा. विरोधी पक्षात राहुन आमदार नितेश राणे स्वताच्या पैशाने व्यवस्थेसाठी धडपडतात. तुम्हा सत्ताधाऱ्यांना तर सरकारच्या पैशाने पण आरोग्य व्यवस्था उभी करता येत नाही ? असा सवाल सत्ताधारी नेत्यांना प्रमोद जठार यांनी केला आहे. अजुनही वेळ गेलेली नाही युद्ध पातळींवर काम करा. खड्डयात घाला तुमची टेंडर पद्धत कोरोना गेला की मग खेळा टेंडर टेंडर आधी ॲाक्सीजन , व्हेंटीलेटर , रेमेडीसीवीर विकत घ्या,आणि लोकांचे जीव वाचवा.कारण जिल्ह्यातील कोरोनाने मृत्युदर वाढत चालला आहे, त्याचा विचार प्रशासन व सत्ताधारी लोकांनी केले पाहिजे,असे मत प्रमोद जठार यांनी व्यक्त केले आहे.

You cannot copy content of this page