विशाल परब:आरोग्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार..
⚡सावंतवाडी ता.०५-: आचारसंहिता लागू झाली आहे. कोकणचे सुपुत्र भाजपचे प्रदेशाध्यक्ष आहेत. तसेच विधानसभा अध्यक्ष व कॅबिनेट मंत्री आहेत. हे कार्यालय आपलं आहे. तुमच्यासाठी ते २४×७ खुलं आहे. ३ डिसेंबरला गुलाल आपल्यालाच उधळायचा आहे असा विश्वास युवा नेते विशाल परब यांनी व्यक्त केला. तसेच आरोग्यासाठी आम्ही सदैव कार्यरत राहणार आहे. फिजीशीयन रुग्णालयात सेवा देत आहे. जनसेवेसाठी मी सदैव तत्पर राहणार आहे. जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपरिषदेवर भाजपचा झेंडा फडकेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
