आम्हाला कोणाची जिरवायची नाही, पण सिंधुदुर्गचा विकास करायचाय…

पालकमंत्री नितेश राणेनगराध्यक्ष पदावर मी ज्यांना बसवले तेच आज आम्हाला आव्हान देण्याचे भाषा करतायत,आम्ही नेमकं कुठे चुकलो हेच कळत नाही..

⚡सावंतवाडी, ता. ०५-:
“सिंधुदुर्गच्या नव्वद टक्के लोकांनी आमच्यावर विश्वास दाखवला आहे. आम्ही कोणाचाही अधिकार हिसकावून घेत नाही. रवींद्र चव्हाण, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मी आम्ही विकासासाठी एकत्र आलो आहोत. आम्हाला कोणाची जिरवायची नाही, पण सिंधुदुर्गचा विकास करायचा आहे,” असे प्रतिपादन पालकमंत्री नितेश राणे यांनी केले.ते सावंतवाडी येथे झालेल्या भाजप कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात बोलत होते.

दरम्यान ते म्हणाले नगराध्यक्ष पदावर मी ज्यांना बसवले तेच आज आम्हाला आव्हान देण्याचे भाषा करत आहे त्यामुळे आम्ही नेमकं कुठे चुकलो हेच कळत नाही असा टोला देखील त्यांनी यावेळी नाव न घेता संजू परब यांना लगावला

संजू परब यांचं नाव न घेता टोला लगावत म्हटलं, “मीच नगराध्यक्ष बनविला आणि आम्हालाच आव्हान देतो, ही खरोखरच आश्चर्याची गोष्ट आहे.”
राणे पुढे म्हणाले, “जर आपण महायुती म्हणून निवडणूक लढलो, तर काही ठिकाणी बंडखोरी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येक कार्यकर्त्यांनी काहीही विचलित न होता एकदिलाने काम करावे. सिंधुदुर्गचा निकाल शंभर टक्के आपल्या बाजूने लावून प्रदेशाध्यक्षांना मोठं गिफ्ट द्या,” असे आवाहन त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

ते म्हणाले, “जिल्हा परिषद अध्यक्ष आणि नगराध्यक्ष हे आमच्याच हातात असले पाहिजेत, तेव्हाच विकासाची गती वाढेल. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे आणि या निवडणुकीतून पक्ष अधिक मजबूत करण्याची संधी आपल्याला मिळणार आहे.”

महाविकास आघाडीवर टीका करताना राणे म्हणाले, “महाविकास आघाडीची अवस्था बिकट आहे. आम्ही बंडखोरी करायला नाही आलो, तर विकासासाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी आलो आहोत. आम्हाला कोणाशी वैर नको, पण मैत्रीपूर्ण लढतीतही विजय आपलाच असला पाहिजे,” असे त्यांनी स्पष्ट केले.

You cannot copy content of this page