सावंतवाडीत भाजप जनसंपर्क कार्यालयाचे थाटात उद्घाटन…

⚡सावंतवाडी ता.०५-:
सावंतवाडीतील भाजप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन आज मोठ्या उत्साहात व थाटात पार पडले. हे जनसंपर्क कार्यालय भाजप पदाधिकारी विशाल परब यांच्या पुढाकाराने उभारण्यात आले असून, या कार्यक्रमाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर तसेच राज्याचे पालकमंत्री नितेश राणे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

या प्रसंगी विशाल परब यांनी सर्व मान्यवर पाहुण्यांचे जोरदार स्वागत केले. कार्यक्रमस्थळी भाजप कार्यकर्त्यांनी घोषणाबाजी करत स्वागत मिरवणूक काढली. नवीन जनसंपर्क कार्यालयाच्या उद्घाटनाने भाजपच्या संघटनात्मक कामकाजाला नवी दिशा मिळणार असल्याची भावना यावेळी व्यक्त करण्यात आली.

You cannot copy content of this page