सावंतवाडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का…

माजी जि.प. सदस्य मायकल डिसोजा आणि माजी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांचा भाजपमध्ये जाहीर प्रवेश..

⚡सावंतवाडी, ता. ०५-: सावंतवाडीत ठाकरे सेनेला मोठा धक्का बसला आहे. माजी जिल्हा परिषद सदस्य मायकल डिसोजा आणि माजी विधानसभा प्रमुख विक्रांत सावंत यांनी नुकताच भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला.

हा प्रवेश भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर आणि पालकमंत्री नितेश राणे यांच्या उपस्थितीत पार पडला. या प्रवेशामुळे ठाकरे सेनेला मोठा धक्का बसल्याचे राजकीय वर्तुळात म्हटले जात आहे.सावंतवाडीतील आगामी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर झालेला हा पक्षप्रवेश महत्त्वाचा मानला जात असून, भाजपच्या संघटनात्मक बळकटीत यामुळे अधिक भर पडणार असल्याची प्रतिक्रिया कार्यकर्त्यांकडून व्यक्त होत आहे.

You cannot copy content of this page