⚡सावंतवाडी ता.०५-:: दक्षिण कोकणचे प्रतिपंढरपूर म्हणून ख्याती पावलेल्या व लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्रीदेवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव आज गुरुवारी 6 नोव्हेंबर रोजी साजरा होत आहे. पहाटे विधीवत पुजेनंतर सकाळी ७ वाजल्यापासून देवीचे दर्शन भाविकांसाठी खुले करण्यात येणार आहे.
सोनुर्ली श्री देवी माऊलीचा वार्षिक लोटांगणाच्या जत्रोत्सवाला दरवर्षी भक्तांची गर्दी होते. यासाठी देवस्थान कमिटीकडून सर्व नियोजित तयारी करण्यात आली आली. यावर्षी जत्रोत्सवावर पावसाचे सावट लक्षात घेता मंदिर परिसरात पत्र्याचा मंडप उभारण्यात आला आहे. भक्तांना दर्शन सुलभ घेता यावे यासाठी खास व्यवस्था करण्यात आली आहे. संपुर्ण मंदिरावर विद्युत रोषणाई करण्यात आली असून मंदिराच्या आतमध्ये फुलांची सजावट सर्वाचे लक्ष वेधून घेत आहे.
यावर्षी मंदिराच्या पाठीमागे खास पार्किंगची व्यवस्था करण्यात आली असून तशा प्रकारचे नियोजन सावंतवाडी पोलीस प्रशासनाच्या मदतीने देवस्थान कमिटी कडून आखण्यात आले आहे.याव्यतिरिक्त जत्रोत्सवाला व्यापार व्यवसायाच्या निमित्ताने येणार्या व्यावसायिकांनी उभारलेल्या दुकानावर पत्रे व प्लास्टिक टाकून पावसापासून बचाव करण्याची तजवीज केली आहे.एकूणच जत्रोत्सवाची उत्सुकता शिगेला पोचली असून जत्रोत्सव उत्साहात आणि सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनासह देवस्थान कमिटीही सज्ज झाली आहे.
पोलिस प्रशानाकडून दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा वाहतुक व्यवस्था केली आहे.तसेच संपुर्ण जत्रोत्सवात कुठला संचित प्रकार होऊ नये यासाठी ज्यादा पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात येणार असल्याचे पोलिस निरिक्षक अमोल चव्हाण यांच्याकडून सांगण्यात आले . एसटी प्रशासनाकडून विशेष जादा बसेस खास जत्रोत्सवानिमित्ताने सोडण्यात येणार आहेत. जत्रौत्सवानिमित्ताने संपुर्ण गावात नवचैतन्य पसरले आहे.
लोटांगणाची जत्रा म्हणून प्रसिद्ध असलेल्या सोनुर्ली येथील श्री.देवी माऊलीचा वार्षिक जत्रोत्सव उद्या…
