*सावंतवाडी मतदारसंघात आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नातून पाच कोटीहून अधिक कामांना मंजूरी

💫 *सावंतवाडी दि.१०-:* सावंतवाडी विधानसभा मतदार संघात 25/15 अंतर्गत 5 कोटी 37 लाखाची कामे सावंतवाडी, वेंगुर्ला व दोडामार्ग तालुक्यामध्ये पालकमंत्री उदयजी सामंत , खासदार विनायक राऊत , आमदार दीपक केसरकर यांच्या प्रयत्नामुळे मंजूर झाली आहे. यामध्ये रस्ते, स्ट्रीटलाईट, हाय मास्ट, मोरी बांधणे व संरक्षण भिंत असे कामे असून गावातील वाडीवर विकासाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाची कामे मंजूर झाली आहेत, त्यामुळे सावंतवाडी तालुक्यातील शिवसेनेच्या सर्व पदाधिकारी लॉकडाउन संपल्यावर आवश्यक कामाचा पाठपुरावा करून सदर कामांचे प्रस्ताव सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे जमा करावे,असे सांगण्यात आले आहे.

You cannot copy content of this page