गुळदुवे येथील श्री विरेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव ६ नोव्हेंबर रोजी….

⚡सावंतवाडी ता.०२-: गुळदुवे गावाचे ग्रामदैवत विरेश्वर सातेरी.येथील प्रसिद्ध विरेश्वर देवाचा वार्षिक जत्रोत्सव गुरुवार दिनांक ६ नोव्हेंबर रोजी होत असून,या दिवशी सकाळी मंदिरात धार्मिक विधी,त्यानंतर मंदिरात नारळ, केळी, ओटी भरणे ,गाऱ्हाणे घालणे नवस बोलणे नवस फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत.
मंदिर आकर्षक फुलांनी सजवून मंदिराला विद्युत रोषणाई करण्यात येते.
रात्रौ ढोल ताश्याच्या गजरात पालखी काढणे व त्यानंतर आरोलकर दशावतार नाट्य मंडळाचा नाट्य प्रयोग होणार असून ह्या वार्षिक जत्रोत्सवाला सर्वांनी उपस्थित राहण्याचे आवाहन गुळदुवे गांवकर मंडळी व ग्रामस्थांनी केले आहे.

You cannot copy content of this page