मळगाव येथे ट्रक–दुचाकी अपघात; दुचाकीस्वार गंभीर जखमी…

⚡सावंतवाडी,ता.०१-: येथील हायवेवरील चॉकलेट फॅक्टरीजवळ आज दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास ट्रक आणि दुचाकी यांच्यात भीषण अपघात झाला. या अपघातात दुचाकीस्वार ट्रकखाली सापडून गंभीर जखमी झाला आहे.

जखमी दुचाकी स्वाराला स्थानिक नागरिकांच्या मदतीने तत्काळ सावंतवाडी येथील रुग्णालयात अधिक उपचारासाठी हलविण्यात आले आहे. अपघाताची माहिती मिळताच मळगाव आणि वेत्ये परिसरातील ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती.दरम्यान, अपघाताचे नेमके कारण समजू शकले नसून पोलीस घटनेचा पुढील तपास करीत आहेत.

You cannot copy content of this page