खा. राऊत यांच्या पाठपुराव्यामुळे कुडाळ शहरासाठी ४४ लाख रुपये निधी मंजूर

शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट यांची माहिती*

*💫कुडाळ दि.१०-:* खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ शहरासाठी ४४ लाख ९० हजार एवढा फार मोठा निधि देऊन कुडाळ शहरवासीयांचे विकासाचे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी फार मोठे योगदान दिलेले आहे. या पूर्वी सुद्धा शिवसेनेच्या माध्यमातून कुडाळ शहरासाठी बलाढ्य निधी दिल्यामुळे शहरवासियांच्या अभिनंदनास पात्र शिवसेना खासदार विनायक राऊत आहेत .असे प्रतिपादन कुडाळ शिवसेना शहरप्रमुख संतोष शिरसाट यांनी केले . कुडाळ शहरासाठी माजी पालकमंत्री दिपकभाई केसरकर यांनी कुडाळ शहरातील रस्ते सुसज्ज होण्यासाठी कोट्यवधींचा निधी दिला तसेच कुडाळ मालवण मतदार संघाचे आमदार वैभवजी नाईक यांनी कुडाळ शहराच्या विकासात भंगसाळ नदी बंधारा , सुसज्ज कुडाळ बस स्थानक,सुसज्ज असे मैदान ,मच्छिन्द्रनाथ नाट्यगृह ,ऐतिहासिक घोडे बाव अशी ठळक कामे कुडाळ शहरवासीयांना आवश्यक होती .ती करून देण्याचे काम आम.नाईक यानी केले.कुडाळचे शिवसेना नगरसेवक यांच्या माध्यमातून यापूर्वी शासनाकडून आलेल्या नगरपंचायतीमार्फत निधीतून मोठ्याप्रमाणात विकास कामे करण्यात आलेली आहेत. आणि यातच शिवसेनेचे सचिव खासदार विनायक राऊत यांनी कुडाळ शहरवासियांसाठी हा मोठ्या प्रमाणात निधी देऊन सुखद धक्का दिलेला आहे. यासाठी कुडाळ शहर शिवसेनेच्या वतीने पालकमंत्री ना.उदय सामंत ,खासदार विनायक राऊत,आम.वैभव नाईक यांचे जाहीर आभार मानून श्री शिरसाट म्हणाले येत्या काळात शिवसेनेच्या हाती कुडाळ शहर नगरपंचायतिची सत्ता शहरवासियांनी विश्वासाने दिल्यास कुडाळ शहर हे विकासाचे शहर संबोधिले जाईल याची प्रचिती निच्छित येईल असा विश्वास शिरसाट यांनी कुडाळ शहरवासीयांना दिला आहे

You cannot copy content of this page