*💫कुडाळ दि.१०-:* युवा भारत संस्थेमार्फत सविता आश्रम अनाव येथे हॅन्ड सॅनिटायझर , हॅन्ड ग्लोज, हँडवॉश, मास्क, व गरजेच्या कपड्यांचे वाटप करण्यात आले आहे. यावेळी संस्थेचे उपाध्यक्ष अमोल निकम, सचिव हितेश कुडाळकर, सहखजीनदार संकेत राणे उपस्थित होते. यावेळी कुडाळकर यांनी आरोग्य यंत्रणा पोलिस यंत्रणा यांना सर्वांनी एकत्र येऊन मदत करावी असे आवाहन केले आहे. तसेच युवा फोरम संस्थेमध्ये प्रतिष्ठित लोक सामाजिक लोक व युवक वर्ग आणि एकत्र येऊन आर्थिक तसेच शक्य होईल तशी मदत या गरजू लोकांसाठी करावी तसेच लोकांना या काही आवश्यक मदत लागली तर आपल्या संस्थेला सांगावे आपण त्यांची आमच्या परीने मदत करू अशी ग्वाही दिली आहे. निकम यांनी तुमच्या आजूबाजूला असणाऱ्या आश्रम किंवा गरजू व्यक्ती असतील यांना आपल्या परीने मदत करावी तसेच बऱ्याच लोकांना या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर बाहेर पडता येत नसल्याने काही मदत लागली तर आम्ही त्यांना संस्थेमार्फत मदत करू असेही सांगितले आहे. यावेळी संस्थेचे इतरही सदस्य उपस्थित होते.
युवा भारत संस्थेकडून सविता आश्रमास सुरक्षा किटचे वाटप
