⚡आंबोली ता.०५-: लाखो पर्यटकांना आकर्षित करणाऱ्या आणि वर्षा पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या अंबोली गावात यावर्षी ‘अंबोली मान्सून महोत्सव’ आयोजित करण्यात आला आहे. अंबोली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून अंबोली मान्सून महोत्सव स्पर्धा आयोजित करण्यात आल्या असून, या माध्यमातून अंबोलीला एक नवीन ओळख मिळणार आहे.
१० ऑगस्ट रोजी सकाळी ८:३० वाजता श्री. देवी माऊली मंदिर जवळ या महोत्सवाचे उद्घाटन होणार आहे. अंबोलीला वर्षा पर्यटनासाठी अधिक लोकप्रिय बनवण्यासाठी आणि पर्यटकांना विविध सुविधा पुरवण्यासाठी ही स्पर्धा एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरेल.
या महोत्सवाच्या माध्यमातून, अंबोलीचा पर्यटन विकास साधला जाणार असून स्थानिक लोकांना रोजगारही उपलब्ध होणार आहे. तसेच, अंबोलीला राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर एक नवीन ओळख मिळेल, अशी अपेक्षा ग्रामपंचायतीने व्यक्त केली आहे.
या कार्यक्रमाला उपस्थित राहून स्पर्धेला प्रोत्साहन देण्याचे आवाहन ग्रामपंचायतीने केले आहे.