किर्लोस येथील ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ चव्हाण यांचा शिवसेनेत प्रवेश…

आडवली-मालडी अनुसूचित जाती सेल विभागप्रमुखपदी नियुक्ती..

⚡मालवण ता.२८-: किर्लोस येथील उबाठा शिवसेनेचे ग्रामपंचायत सदस्य गुरुनाथ दत्ताराम चव्हाण यांनी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता सामंत यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी श्री. चव्हाण यांची शिवसेनेच्या आडवली मालडी अनुसूचित जाती सेल विभागप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली. दत्ता सामंत यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले.

वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या आशीर्वादाने तसेच धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या प्रेरणेने व शिवसेनेचे मुख्य नेते माननीय श्री. एकनाथ शिंदे साहेब यांच्या आदेशानुसार शिवसेना पक्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या मालवण तालुका आडवली मालडी अनुसूचित जाती सेल विभागप्रमुखपदी आपली नियुक्ती करण्यात येत आहे. सदर नियुक्तीचा कालावधी एका वर्षाचा असेल. वंदनीय हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा हिंदुत्वाचा विचार आणि धर्मवीर आनंद दिघे साहेब यांची शिकवण याचा आपण सक्रियपणे प्रचार आणि प्रसार कराल तसेच शिवसेना पक्ष वाढीसाठी आपण सर्वांना सोबत घेऊन कार्य कराल असा विश्वास त्यांना दिलेल्या नियुक्ती पत्रातून व्यक्त करण्यात आला आहे.

याप्रसंगी शिवसेना शहरप्रमुख दीपक पाटकर, छोटू ठाकूर, सुधीर साळसकर, बाबू परब, शहर संघटक राजू बिडये, पंकज वर्दम, प्रशांत परब, बाळा राऊत, पोईपचे सरपंच शिवराम पालव, नारायण धुरी, भाऊ मोर्जे, पिंटो गावकर शानू वालावलकर यांच्यासह शिवसेनेचे अन्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

You cannot copy content of this page