⚡कणकवली ता.२६-:
कणकवली तालुका भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाच्या ग्रामीण मंडळ अध्यक्षपदी वरवडे गावचे माजी उपसरपंच इब्राहिम अली शेख यांची निवड करण्यात आली आहे. या निवडीबद्दल पालकमंत्री नीतेश राणे यांनी त्यांना शुभेच्छा दिल्या आहेत.
भाजपा अल्पसंख्यांक मोर्चाचे जिल्हाध्यक्ष निसार शेख यांनी ही नियुक्ती केली आहे. भाजपा प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री नीतेश राणे व जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत यांच्या सूचनेनुसार ही नियुक्ती करण्यात आलेली असल्याचे श्री. शेख यांनी सांगितले.
इब्राहीम शेख हे गेल्या अनेक वर्षांपासून माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे कट्टर कार्यकर्ते म्हणून ओळखले जातात. वरवडे गावचे उपसरपंच म्हणून तसेच सुमारे २० वर्षे ग्रा.प. सदस्य म्हणून त्यांनी काम पाहिले आहे. अनेक सामाजिक उपक्रमात त्यांचा सक्रिय सहभाग असतो. त्यांच्या निवडीबद्दल पालकमंत्री नीतेश राणे यांनी अभिनंदन केले असून यावेळी जिल्हाध्यक्ष निसार शेख, शानू शेख व सलमान निशाणदार आदी उपस्थित होते.
