Headlines

जिल्हा पोलिस ज्येष्ठ नागरिकांना देत आहेत संवादातून आधार…

दिवाळी सणानिमित्त आयोजन:
९५१ ज्येष्ठांशी साधला संवाद..

ओरोस ता २०
सिंधुदुर्ग पोलीसांनी एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना दिवाळी सण निमित्त संवाद साधत आधार देण्याचा उपक्रम सुरू केला आहे. यासाठी जिल्हाभरात २२ ठिकाणी ज्येष्ठ नागरिक मेळावे घेत ८०१ ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधला. तसेच तसेच १५० ज्येष्ठ नागरिकांच्या घरी जाऊन त्यांच्याशी संवाद साधला. जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर यांनी अणाव येथील आनंदाश्रय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधत त्यांना सुरक्षित वातावरण असल्याचा आधार दिला.
सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये कम्युनिटी पोलीसींग अंतर्गत पोलीस दलाकडुन ज्येष्ठ नागरीक मदत कक्ष कार्यरत करण्यात आलेले आहे. त्या अंतर्गत सिंधुदुर्ग जिल्हा पोलीस दलाकडुन हेल्पलाईन क्रमांक ७०३६६०६०६० ही सेवा कार्यन्वित करण्यात आलेली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांचे संकल्पनेतुन संवादातुन आधार हे व्हॉटसअॅप चॅनेल सुरु करण्यात आलेले आहे. नमुद क्रमांकावर एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांच्या समस्या दुर करण्यासाठी व्हॉटसअॅप व्हिडीओ व ऑडीओ कॉलद्वारे संवाद साधला जातो.
दिवाळी सणाच्या निमित्ताने एकाकी राहणाऱ्या ज्येष्ठ नागरीकांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्याकरीता तसेच त्यांच्या मध्ये सुरक्षीततेची भावना निर्माण होणेकरीता १९ ऑक्टोबर रोजी पोलीस अधीक्षक डॉ. मोहन दहिकर यांनी स्वतः कुडाळ तालुक्यातील अणाव येथील आनंदाश्रय या वृध्दाश्रमास भेट देवुन तेथील ज्येष्ठ नागरीकांशी सुसवांद साधुन दिवाळी सणाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच काही अडचणी असल्यास हक्काने आवाज देण्याबाबत विनंती केली.
या उपक्रमा अंतर्गत अपर पोलीस अधीक्षक नयोमी साटम, सावंतवाडी उपविभागीय पोलीस अधिकारी विनोद कांबळे, कणकवली उपविभागीय पोलीस अधिकारी घनश्याम आढाव, तसेच सर्व पोलीस ठाणे प्रभारी अधिकारी यांनी ज्येष्ठ नागरीकांसाठी एकुण २२ ज्येष्ठ नागरीक मेळावे आयोजित केले होते. या मेळाव्या करीता ८०१ ज्येष्ठ नागरीक उपस्थित होते. तसेच ज्या ज्येष्ठ नागरीकांना मेळाव्या करीता प्रत्यक्ष उपस्थीत राहणे शक्य झाले नाही, अशा एकूण १५० ज्येष्ठ नागरीकांच्या घरी जावून पोलीस अधीकारी व अंमलदार यांनी भेट देवून दिवाळी शुभेच्छा दिल्या. आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक मेळाव्यात ज्येष्ठ नागरीक कायदा, सायबर क्राईम, संवादातुन आधार, समुद्र संदेश इत्यादी उपक्रमांची माहिती देण्यात आली. तसेच उपक्रमाअंतर्गत मालवण व वेंगुर्ला पोलीस ठाणे यांनी ज्येष्ठ नागरीकांकरीता आरोग्य तपासणी शिबीर, मनोरंजन कार्यक्रम यांचे सुद्धा आयोजन केले होते.

फोटो ओळ: अणाव: आनंदाश्रय वृद्धाश्रमातील ज्येष्ठ नागरिकांशी संवाद साधताना जिल्हा पोलिस अधीक्षक डॉ मोहन दहिकर सोबत अन्य

You cannot copy content of this page