⚡मालवण ता.१६-:
मालवण तालुक्यातील पूर्ण प्राथमिक शाळा कोळंब नंबर – १ या शाळेला ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे जिल्हा सचिव श्री. अर्जुन परब यांच्या प्रयत्नातून 16000 रू. किंमतीचा
इपसन कंपनीचा कलर प्रिंटर वाय
फाय सुविधे सहीत प्रदान करण्यात आला.
याबाबतचा कलर प्रिंटर प्रदान समारंभ ह्युमन राईट असोसिएशन फॉर प्रोटेक्शन या संघटनेचे कोकण विभागीय अध्यक्ष संतोष नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली नुकताच शाळेमध्ये संपन्न झाला. या प्रसंगी संघटनेचे जिल्हा अध्यक्ष सुधीर धुरी, जिल्हा सचिव- अर्जुन परब, जिल्हा सहसचिव- श्याम माडीये, तालुका अध्यक्ष- प्रमोद कांडरकर, तालुका उपाध्यक्ष- संग्रामसिंह पवार, तालुका सह सचिव- विनोद वेंगुर्लेकर तसेच कोळंब शाळा माजी विद्यार्थी संघटना अध्यक्ष श्री. कवटकर, सभासद संदीप भोजने, श्री. नऱ्हे, श्री. ढोलम आदी उपस्थित होते.
याप्रसंगी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुधीर धुरी यांनी ह्युमन राईट संघटनेचे कार्य व महत्व थोडक्यात सांगितले. तसेच प्रमोद कांडरकर यांनी विविध शाळांसाठी आता पर्यंत केलेली कामे व भविष्यातील योजना याबाबत माहिती दिली. यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांना जात प्रमाणपत्र व वय अधिवास दाखल्यांचे वाटप करण्यात आले. शेवटी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. वस्त यांनी संघटनेचे व उपस्थितांचे आभार मानले.
कोळंब नं.१ शाळेला ह्युमन राईट असोसिएशनकडून १६ हजारांचा कलर प्रिंटर प्रदान…
