आडवली नं. 1शाळेतील विद्यार्थ्यांनी बनविले आयुर्वेदिक ‘निर्मल उटणे

⚡मालवण ता.१७-:
विद्यार्थ्यांच्या अंगी उद्योजक कौशल्यांचा विकास होऊन त्यांच्या मनात व्यवसायिक अभिरुची विकसित व्हावी या हेतूने आडवली नं 1 शाळा विविध उपक्रम राबाविते. याच उपक्रमाचा भाग म्हणून इको क्लबच्या विद्यार्थ्यांनी आयुर्वेदिक उटणे निर्माण केले असून त्याच्या विक्रीचा शुभारंभ श्री. अरुण लाड यांच्या शुभहस्ते संपन्न झाला.

हे उटणे पूर्णतः नैसर्गिक घटकांपासून बनविले असून चंदन, मुलातांनी माती, आंबेहळद, गुलाब पाकळ्या पावडर अशा विविध घटकांच्या वापरांतून बनविले आहे. विशेष म्हणजे निर्माल्य असलेल्या गुलाबाच्या पाकळ्या वाळवून त्या पासून पावडर बनविली आहे.
निर्मल उटणे असे नामकरण करण्यात आले असून स्थानिक बाजारपेठेत याची विक्री केली जाणार आहे. यांतून मिळणारा नफा विद्यार्थी वेलफेअर फंडात जमा करून त्याचा विनियोग गरजू विद्यार्थ्यांसाठी करण्यात येईल.

या उपक्रमासाठी शाळेतील शिक्षक श्री. रामचंद्र कुबल श्रीम. तनुजा तांबे श्रीम. रागिणी ठाकूर आणि वेदिका वाघाटे यांनी मार्गदर्शन केले. विशेष म्हणजे विद्यार्थ्यांनी कच्चा माल निर्मिती, उत्पादन, प्रिंटिंग, पॅकिंग, विक्री आणि विपणन, डिपार्टमेंट करून कार्य केले. या उपक्रमाचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

You cannot copy content of this page