बांदा/प्रतिनिधी
सिंधुदुर्ग जिल्हाधिकारी सौ. तृप्ती धोडमिसे यांची जवाहर नवोदय विद्यालय, सांगेली येथील पालक-शिक्षक परिषद सदस्यांनी सिंधुनगरी येथील जिल्हाधिकारी कार्यालयात सदिच्छा भेट घेतली.
अलिकडेच जिल्हाधिकारी सौ. धोडमिसे यांनी नवोदय विद्यालय सांगेली येथे व्यवस्थापन समितीची बैठक घेऊन शाळेच्या विविध शैक्षणिक व प्रशासकीय बाबींचा सविस्तर आढावा घेतला होता. या पार्श्वभूमीवर पालक-शिक्षक परिषदेच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात भेट देऊन त्यांचे मनःपूर्वक आभार मानले तसेच त्यांच्या पुढील कार्यकाळासाठी शुभेच्छा दिल्या.
यावेळी शाळेतील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसह भौतिक सुविधांच्या वाढीसाठी आवश्यक उपाययोजनांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. विद्यालयाच्या सर्वांगीण विकासासाठी निवेदनही जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. या भेटीत पालक-शिक्षक परिषदेचे सदस्य राजेंद्र खडपे, समाधान जठार, हेमंत मोर्ये, अनिल काटकर, कैलास गावकर, सुनील केसरकर, महेश संसारे, स्वागत नाटेकर व दीपक वाणी आदी उपस्थित होते.
फोटो:-
ओरोस येथे जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना पुष्पगुच्छ देऊन शुभेच्छा देताना पालक शिक्षक संघाचे पदाधिकारी.
जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे यांना नवोदय विद्यालय सांगेलीच्या पालक-शिक्षक परिषदेची सदिच्छा भेट…
