सर्व शिक्षक संघटना एकवटल्या..
ओरोस ता १६
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील प्राथमिक शिक्षकांचे प्रलंबित प्रश्न, अशैक्षणिक कामे, तसेच वेळोवेळी उद्भवलेल्या प्राप्तकालीन समस्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्व प्राथमिक शिक्षक संघटनानी स्वतंत्रपणे व सर्व संघटना एकत्र येऊन निवेदने ,प्रत्यक्ष भेट घेऊन, चर्चा, आंदोलने करूनही आजपर्यंत कोणताही विषय परिपूर्ण सोडविण्यासाठी प्रयत्न झालेले नाहीत. त्यामुळे शिक्षणाधिकारी प्राथमिक यांच्या ढिसाळ कारभारा विरोधात महाराष्ट्र राज्य सर्व प्राथमिक शिक्षक संघटना व्यासपीठ सिंधुदुर्ग यांच्यावतीने . शनिवार ८ नोव्हेंबर २०२५ रोजी दुपारी २:३० ते. ५ यावेळेत जिल्हा परिषद सिंधुदुर्गच्या समोर महामोर्चा व आंदोलन करण्यात येणार आहे, असा इशारा देण्यात आला आहे.
