गणित संबोध परीक्षेत झाराप कामळेवीर शाळेचे यश…

⚡वेंगुर्ला ता.१५-: सिधुदुर्ग गणित अध्यापक मंडळातर्फे घेण्यात आलेल्या गणित संबोध परीक्षेत झाराप कामळेवीर प्राथमिक शाळेतील इयत्ता पाचवीमधून बसलेले १९ पैकी १८ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. कु. आराध्या महेश आळवे हिने ९६ गुण मिळवित शाळेमध्ये प्रथम क्रमांक पटकाविला.
परीक्षेमध्ये द्वितीय-श्रीया प्रविण गोवेकर (९४) आणि तृतीय-श्रेया रविकांत मुंडये (८८) यांनी क्रमांक पटकाविले. तर उत्तीर्ण विद्यार्थ्यांमध्ये अनुष्का सोनगे, रिया रेडकर, मंथन रेडकर, तन्वी वराडकर, उनैजा राजगुरू, फवाद शेख, सिरत शेख, पार्थ मांजरेकर, आराध्या मांजरेकर, सई मांजरेकर, काव्या पाटकर, आहील जद्दी, विधी नाईक, संस्कृती गुडेकर, तनुष मांजरेकर आदींचा समावेश आहे. या विद्यार्थ्यांना वर्गशिक्षक विलास गोठोस्कर, अनघा निरवडेकर व मुख्याध्यापक विजय कदम यांचे मार्गदर्शन लाभले.
फोटो – आराध्या आळवे, श्रीया गोवेकर

You cannot copy content of this page